पुसून टाक
इतकं सोपं असतं का पुसून टाकणं?
एखाद्या चित्रात भरलेला रंग
किंवा एखादे स्वप्न जे झाले भंग
एखाद्याचा झालेला समज अथवा गैरसमज
किंवा एखाद्याने बोलून दाखवलेली गरज
एखाद्याचे बोललेले शब्द कोरलेले मनावर
किंवा त्या आठवणी एखादा जगतो ज्यांच्यावर
एखाद्याच्या कर्तृत्वावर उठलेला प्रश्न
किंवा एखाद्याच्या चारित्र्यावर लागलेला कलंक
इतकं सोपं असतं का पुसून टाकणं?
No comments:
Post a Comment